YouTube व्हिडिओ

4. दहावी-बारावीनंतरचे करिअर पर्याय

दहावी-बारावीचे निकाल तोंडावर आलेत. विद्यार्थ्यांनी यापुढची शिक्षणाची वाट निवडताना ती केवळ मार्कांवर ठरवावी की आपला कल-आवड आणि क्षमता यांचाही आढावा घ्यावा? मुळात ज्या शाखेत-अभ्यासक्रमाला जायचंय त्यामध्ये आपल्याला गती आहे हे कसं ओळखायचं? पिअर प्रेशर किंवा पालकांचा दबाव कसा टाळायचा? पालक-मुलांमध्ये यासंदर्भात संवाद नेमका कसा हवा? या सगळ्या कळीच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया प्रसिद्ध लेखक, डॉक्टर आणि करियर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत यांच्याकडून.

3. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांची इरसाल पत्रापत्री | Dilip Prabhavalkar | Vijay Kenkare

तात्यासाहेब आणि माधवराव हे जिवश्चकंठश्च मित्र! त्यांच्या मैत्रीचं वेगळेपण म्हणजे आजच्या मोबाईल-इंटरनेटच्या युगातही त्यांचा अखंड सुरू असलेला पत्रव्यवहार. या पत्रांतून कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो, तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. फक्त फॉरेनच्या गोष्टी नाही काही, आयपीएलपासून ते फ्लेक्सबाजीपर्यंत देशी गोष्टींवरचं भाष्यही या पत्रांतून समोर येतं. ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या तिरकस लेखणीतून साकारलेल्या पत्रापत्री या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया दस्तुरखुद्द प्रभावळकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेते विजय केंकरे यांच्याकडून.

2. पालकत्वाचं परफेक्ट गाईड | Parenting Tips | Marathi Podcast

अडनिड्या वयात मुलं जेवढी भांबावलेली असतात ना त्याही पेक्षा आपलं मूल असं का वागतंय या आणि अशा अनेक प्रश्नांनी गोंधळलेल्या पालकांना एका फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईडची गरज असते. याच स्वरूपाचं राजहंस प्रकाशनाचं डॉ. वैशाली देशमुख यांनी लिहिलेलं प्रिय पालक हे पुस्तक मार्च २०२४ मध्ये प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाची ओळख आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत.

1. दुर्दम्य : भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा | Rajhans Prakashan | Marathi Podcast

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्यप्राय उद्दिष्टही गाठता येऊ शकतात. मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे लिखित दुर्दम्य हे पुस्तक म्हणजे सैन्यातील उत्तुंग नेतृत्वाची आणि विलक्षण शौर्याची जणू सोनेरी पानं आहेत. भारतीय सैन्यदलांत आपली अमीट मुद्रा उमटवलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा जाणून घेऊया या एपिसोडमध्ये!

राजहंसी मोहोर - पॉडकास्ट

१ मे २०२४ पासून दर बुधवारी सकाळी ९ वा.