YouTube व्हिडिओ

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: वीणा गवाणकर | रॉबी डिसिल्वा

अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं… १९६० चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते. ऐकुया अशा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास.. लेखिका वीणा गवाणकर यांच्याकडून..

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: डॉ. मृदुला बेळे | कोरोनाच्या कृष्णछायेत

कोरोनाचा विषाणू बघता बघता एका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला. सगळ्या जगावर हे सावट पसरलं. कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती. बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं. हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत, भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे – अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारं आणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं, औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानं याचाही लेखाजोखा मांडणारं पुस्तक! औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्या अभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेली धोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणी "कोरोनाच्या कृष्णछायेत…" ऐकुया लेखिका डॉ. मृदुला बेळे यांच्याकडून..

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक: अंबरीश मिश्र | शुभ्र काही जीवघेणे

कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान-सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील. परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. ‘शुभ्र काही जीवघेणे’ शोधत असतात. आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य, नाटय, संगीत अन् सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्त्वं या पुस्तकाला रेलून उभी आहेत. प्रत्येकाचं जगणं भिन्न. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या हालचाली अगदी वेगळयाच. ऐकुया 'शुभ्र काही जीवघेणे' या पुस्तकाबद्दल लेखक अंबरीश मिश्र यांच्याकडून.

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: माधुरी शानभाग | एपीजे अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध

विख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्याबाबत त्यांच्या लोकप्रियतेला साजेसे विपुल लेखन झाले असले तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत. एक मनस्वी, वृक्षप्रेमी पर्यावरणवादी…जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडीलधारा…ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक… काल १५ ऑक्टोबर रोजी साजरा झालेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त आर. रामनाथन लिखित आणि माधुरी शानभाग अनुवादित 'ए. पी. जे. अब्दुल कलाम' एक व्यक्तिवेध या पुस्तकाबद्दल ऐकुया अनुवादक माधुरी शानभाग यांच्याकडून..

राजहंस प्रकाशन | ऑनलाईन प्रकाशन | सोन्याच्या संगतीत | सुनील शिरवाडकर

सुनील शिरवाडकर लिखित, राजहंस प्रकाशित, 'सोन्याच्या संगतीत' या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा.