YouTube व्हिडिओ
12. रोहिणी निरंजनी: कथक गुरू रोहिणी भाटे जन्मशताब्दी विशेष
ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. ‘जाणिजे यज्ञकर्म’ या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अॅकॅडेमेशियन - अशा परिपूर्ण कलाकार - ‘टोटल आर्टिस्ट’- रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे रोहिणी निरंजनी
11. औरंगजेब, दरोडा आणि Artificial Intelligence!
धूर्त, कपटी, संशयी अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेब बादशहाला १६९५ साली एका ब्रिटिश समुद्री दरोडेखोरानं मोठाच गंडा घातला. औरंगजेबाच्या मालकीचं गंज-ई-सवाई हे अवाढव्य जहाज त्या वर्षी लुटण्यात आलं होतं. विशेष म्हणजे औरंगजेबानं जंग जंग पछाडूनही तो त्या दरोडेखोरापर्यंत शेवटपर्यंत पोचूच शकला नाही. हा जिव्हारी लागलेला अपमान विसरत औरंगजेबानं या दरोड्याचा तपास का थांबवला असेल, याचा शोध आजच्या आर्टिफिशल इंटलिजन्सच्या साहाय्यानं घेण्याचा प्रयत्न म्हणजे सुरेश वांदिले यांची १६९५: स्मार्ट रोबो, एआय व औरंगजेब ही कादंबरी आहे. या आगळ्यावेगळ्या कादंबरीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
10. अबला नव्हे सक्षम सीतेची कथा | Seeta
सीतेच्या अप्रकाशित तेजस्वीतेवर प्रकाश टाकणाऱ्या लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर लिखित सीता या कादंबरीची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत.
व्याकुळ पिंपळ | हिमांशु कुलकर्णी
एक व्यक्ती बी.टेक मध्ये विद्यापीठाच्या सुवर्णपदकाची मानकरी होते आणि मग आय. आय. एम. अहमदाबाद मधून एम.बी.ए. करते. पण ‘एक भला माणूस बनण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले’ हिमांशु कुलकर्णी मराठी कविता आणि उर्दू शायरीवर मनापासून प्रेम करतात. अश्यातच त्यांच्या मराठी गजलांच्या ध्वनिफिती आणि अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘व्याकुळ पिंपळ’ हा त्यातील ७वा. तर ऐकुया कवींचे मनोगत!
9. सायबर अटॅक्सचा थरारक मागोवा | Cyber Crimes |
सायबर क्राईम्स हे नुसते आपल्या दारापर्यंत येऊन थांबले नाहीयेत तर खिशातल्या स्मार्टफोनमुळे शब्दशः एका क्लिकवर आले आहेत. ऑनलाईन विश्वातल्या या स्मार्ट चोरांचा सामना कसा करायचा हा प्रश्न आज प्रत्येकाला भेडसावतोय. राजहंस प्रकाशनाचं सायबर अटॅक हे नवीन पुस्तक सायबर क्राईमचं अस्पर्श आणि थरारक असं विश्व उलगडतं. या अनोख्या पुस्तकाची ओळख आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत.