YouTube व्हिडिओ

8. आर्थिक गुन्हेगारांच्या मागावर | Apurva Joshi

दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये, या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा कैक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन अशा लबाड कंपन्यांनी. त्यामुळंच प्रश्न पडतो की हे आर्थिक घोटाळे नेमके घडतात कसे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्यांचे सूत्रधार शोधतं कोण? डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी लिखित ‘आर्थिक गुन्हेगारीचं अंतरंग’ हे नवीन पुस्तक फायनान्शियल फ्रॉड्सचं विलक्षण गुंतागुंतीचं विश्व उलगडतं. या पुस्तकाची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत.

7. निसर्ग शब्दबद्ध करणारा अवलीया | पर्यावरण दिन विशेष

निसर्ग-पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करताना केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही, आपण तसं जगायलाही हवं असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे १९९३ साली त्यांनी पुणं-पुण्यातली उत्तम नोकरी हे सगळं कायमचं सोडलं. कोकणातल्या एका खेड्यात जाऊन ते कुटुंबासह स्थायिक झाले. गेली ३१ वर्ष निसर्गस्नेही जीवनाचा ध्यास पुढे नेतानाच लिखाणाचा वसाही ते नेटानं पुढे नेत आहेत. प्रसिद्ध लेखक आणि पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांच्या ३८ वर्षांच्या लेखन प्रवासाविषयी आणि त्यांच्या विलक्षण जगण्याविषयीही जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

6. वर्धापन आणि वारसा राजहंसचा

मराठी साहित्यविश्वात मोलाचं योगदान नोंदवत असलेल्या, मराठी साहित्यातल्या गोल्डन पिरियडचं साक्षीदार असलेल्या, आणि ताज्या दमाच्या लेखकांकडून आजही अविरतपणे उत्तम साहित्याची निर्मिती करत असलेल्या राजहंस प्रकाशनाचा १ जून हा वर्धापनदिन. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि श्री. ग. माजगावकर यांनी १९५२ मध्ये म्हणजेच बरोबर ७२ वर्षांपूर्वी राजहंसची स्थापना केली. सात दशकांहून अधिक गौरवशाली वारसा लाभलेल्या या राजहंसी वाटचालीविषयी जाणून घेऊया राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे यांच्याकडून.

5. सवाष्ण: वाड्याच्या गूढ गर्भात

वाड्याच्या भग्न भिंती, पुसट झालेली भित्तीचित्रं, अंधारा निमुळता जिना, चौकातली दगडी फरसबंदी आणि एका खोलीत कोंडलेली भ्रमिष्ट व्यक्ती…रहस्य, गूढ, भयरसांनी युक्त अशी कादंबरी कुणाला आवडणार नाही? राजहंस प्रकाशनाच्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धा विजेती सवाष्ण या कादंबरीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

4. दहावी-बारावीनंतरचे करिअर पर्याय

दहावी-बारावीचे निकाल तोंडावर आलेत. विद्यार्थ्यांनी यापुढची शिक्षणाची वाट निवडताना ती केवळ मार्कांवर ठरवावी की आपला कल-आवड आणि क्षमता यांचाही आढावा घ्यावा? मुळात ज्या शाखेत-अभ्यासक्रमाला जायचंय त्यामध्ये आपल्याला गती आहे हे कसं ओळखायचं? पिअर प्रेशर किंवा पालकांचा दबाव कसा टाळायचा? पालक-मुलांमध्ये यासंदर्भात संवाद नेमका कसा हवा? या सगळ्या कळीच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया प्रसिद्ध लेखक, डॉक्टर आणि करियर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत यांच्याकडून.