YouTube व्हिडिओ
संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: डॉ. सुजला शनवारे - देसाई | आम्ही फौजी
मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी ते एका सेन्याधिकाऱ्याची पत्नी... हा प्रवास लेखिका सुजला देसाई यांनी अतिशय ओघवत्या शैलीत वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.... आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'राजहंस'च्या 'आम्ही फौजी' या पुस्तकाच्या लेखिकेशी संवाद...
राजहंस प्रकाशन | स्टीव्ह आणि मी | सोनिया सदाकाळ- काळोखे
स्टीव्ह इरविन म्हणजे जगविख्यात प्राणिप्रेमी! मात्र मगरमिठीत आयुष्याचा शेवट झालेल्या स्टीव्हबद्दल, त्याच्या प्राणी प्रेमाबद्दल आणि पत्नी म्हणून असलेल्या आपल्या नात्याबद्दल त्याची पत्नी टेरी इरविन हिने 'स्टीव्ह आणि मी' हे पुस्तक लिहिले आहे. सोनिया सदाकाळ- काळोखे यांनी सदर पुस्तकाचा अनुवाद केला आहे. या पुस्तकाविषयी प्रसिद्ध लेखक आणि आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केलेले भाष्य...
संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक: सुनील दांडेकर | नास्तिकयात्रा
संवाद राजहंसी सारस्वतांशी आधुनिक विज्ञानाने निर्माण केलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचा गोषवारा म्हणजे 'राजहंस प्रकाशन'चे 'नास्तिकयात्रा' हे पुस्तक....या लेखनाच्या प्रवासाबाबत वाचकांशी संवाद साधताहेत लेखक सुनील दांडेकर....तेव्हा जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतीबाबत....
राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | कथा अकलेच्या कायद्याची | प्रा. डॉ. मृदुला बेळे
गोष्ट राजहंसी पुस्तकाची कथा अकलेच्या कायद्याची विविध क्षेत्रातील संशोधन, त्याचे पेटंट, कॉपीराइट, बौद्धिक संपदा कायदा, ट्रेडमार्क्स हे काहीसे तांत्रिक विषय आहेत. मराठीत याबाबत फारसे लिहिले गेलेले नाही. आपला देश या विषयांबाबत मागील काही वर्षांत साक्षर व्हायला सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तांत्रिक परंतु अतिशय महत्त्वाच्या विषयांची माहिती देणारे ‘कथा अकलेच्या कायद्याची’ हे पुस्तक डॉ. मृदुला बेळे यांनी लिहीले आहे. यामध्ये त्यांनी क्लिष्ट वाटणारे विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने परंतु सोप्या भाषेत मांडले आहेत. या पुस्तकाबाबत डॉ. बेळे यांनी राजहंसच्या वाचकांशी संवाद साधला आहे. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी घेतलेली डॉ. बेळे यांची खास मुलाखत...
राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | प्रशांत दीक्षित | रावपर्व
सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! देशाची अर्थशक्ती जागवून उद्योगक्षेत्र अन् बाजारपेठेची पक्की बांधणी करणारे उत्तम प्रशासक आणि कॉंग्रेसचे धडाडीचे आधारस्तंभ राव यांच्यावर मराठीत म्हणावे तितके लिखाण उपलब्ध नाही. तत्कालीन भारतीय राजकारण, कॉंग्रेसची विचारधारा, देशाचे अर्थिक गणित रुळावर आणण्यामध्ये राव यांचे असणारे योगदान याचा धांडोळा ‘रावपर्व’ या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी घेतला आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रवास, त्यासाठी लेखकाने केलेला अभ्यास आणि दीक्षित यांनी पत्रकारिता करत असताना राव यांच्या कारकिर्दीचे केलेले निरीक्षण यांच्या आधारे आपल्या पुस्तकलेखनाविषयी प्रशांत दीक्षित यांनी मांडलेले मनोगत...