Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

64. जगणं प्रेमाचं अन् मरणंही | Vaidehi Deshpande

'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी...जगणं प्रेमाचं अन् मरणंही..

63. ससा झाडावर गेलाच कसा | Children Stories

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित ससा झाडावर गेलाच कसा ही गोष्ट उर्मी दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.

62. लैंगिकता संवाद का महत्वाचा? | Dehabhan | Niranjan Medhekar

मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय? हे आणि असे अनेक प्रश्न...सर्व वयोगटाला पडणारे...ते कोणाला विचारायचे? या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं पुस्तक...देहभान

61. पेरूची पार्टी | Rajhans Prakashan | Children Stories

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. संजीवनी बोकील लिखित पेरूची पार्टी ही गोष्ट आयूष जोशी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.

60. चिरतरुण स्वर: आशा भोसले | Asha Bhosale

आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची...गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद...चुकवू नये अशी मैफल...