Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा! | Vasundhareche Shodhyatri

प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

28. आपण एका टकमक टोकाकडे चाललोय? | Atul Deulgaonkar

कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच: हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगणारं निसर्गकल्लोळ हे पुस्तक घेऊन लेखक, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आले आहेत.

27. वस्त्र परंपरेचा अनमोल ठेवा

अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.

26. दंव भिजली वही | Himanshu Kulkarni

"फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे." मंगेश पाडगावकर

25. आनंदाच्या दाही दिशा: मुक्त मुशाफिरी | Dr. Aarati Ranade

ही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर कधी स्वत:च्या मनात डोकावून प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे गुंते समजावून घेण्यासाठी केलेली. हेतू, साधने आणि साध्य काहीही असो, आहे कमालीची आनंददायी आणि चिंतनगर्भ.