YouTube व्हिडिओ

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: माधुरी शानभाग | एपीजे अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध

विख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्याबाबत त्यांच्या लोकप्रियतेला साजेसे विपुल लेखन झाले असले तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत. एक मनस्वी, वृक्षप्रेमी पर्यावरणवादी…जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडीलधारा…ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक… काल १५ ऑक्टोबर रोजी साजरा झालेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त आर. रामनाथन लिखित आणि माधुरी शानभाग अनुवादित 'ए. पी. जे. अब्दुल कलाम' एक व्यक्तिवेध या पुस्तकाबद्दल ऐकुया अनुवादक माधुरी शानभाग यांच्याकडून..

राजहंस प्रकाशन | ऑनलाईन प्रकाशन | सोन्याच्या संगतीत | सुनील शिरवाडकर

सुनील शिरवाडकर लिखित, राजहंस प्रकाशित, 'सोन्याच्या संगतीत' या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा.

राजहंस प्रकाशन | मोबाईल ॲप चे उदघाटन | दिलीप प्रभावळकर

नमस्कार वाचकहो, आजपासून राजहंस प्रकाशनाचे मोबाईल ॲप आपणां सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. खालील लिंक ला क्लिक करून तुम्ही अँप डाउनलोड करू शकता. Use following link for installing on your Android device: https://play.google.com/store/apps/de... Use following link for installing app on your Apple device: https://apps.apple.com/us/app/id15326...

शब्दोत्सव | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक अंबरीश मिश्र | चौकात उधळले मोती

अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आयोजित, "५९१ व्या दीपावली शब्दोत्सव निमित्त" संवाद राजहंसी सारस्वतांशी - लेखक अंबरीश मिश्र चौकात उधळले मोती.. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी ‘मीर’, ‘सौदा’, ‘ज़ौक़’, मिर्झा ग़ालिब, ‘मोमिन’, दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल. राजहंस प्रकाशित, चौकात उधळले मोती या पुस्तकाबद्दल ऐकुया लेखक अंबरीश मिश्र यांच्याकडून..

शब्दोत्सव २०२० | वाचनसंस्कृतीचा नवा प्रवास

अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आयोजित, शब्दोत्सव २०२० निमित्त सादर होत आहे, वाचनसंस्कृतीचा नवा प्रवास: मुद्रित पुस्तकाकडून डिजीटल रूपातल्या पुस्तकांकडे सहभाग: शिरीष शेवाळकर, राजहंस प्रकाशन मिलिंद परांजपे, ज्योत्स्ना प्रकाशन सुश्रुत कुलकर्णी, संगणक तज्ञ, लेखक