बातमी लेख
-
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार
सातारा येथील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष मा. विश्वास पाटील यांचा सत्कार मंगळवारी (१६ सप्टेंबर) राजहंस प्रकाशनातर्फे करण्यात आला. 'झाडाझडती' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर पुण्यात आल्यानंतर 'राजहंस'च्या कार्यालयात प्रा. ग. प्र. प्रधान आणि 'मृत्युंजयकार' शिवाजी सावंत यांच्या हस्ते तीन दशकांपूर्वी झालेल्या पाटील यांच्या सत्काराच्या छायाचित्राची भेट दिल्याने हा क्षण विशेष ठरला. या वेळी (डावीकडून) 'राजहंस'चे सर्वेसर्वा मा. दिलीप माजगावकर, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, मा.विश्वास पाटील आणि ज्येष्ठ लेखक भारत सासणे.
Read more...