YouTube व्हिडिओ

15. युद्धानंतर: युद्धग्रस्त स्थितीचा काव्यमय आढावा | Aditya Davane

कोणत्याही संवेदनशील माणसाला युद्ध नको असतं. पण प्रत्यक्षात असं होत नाही. माणसांना असंवेदनशील करणारी युद्धं हा चिंतेचा विषय घेऊन आदित्य दवणे युद्धानंतर हा कवितासंग्रह घेऊन आले आहेत. आजच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या या कवितासंग्रहाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

14. Story of a Real-life Phoenix who Rose from the Ashes | Sonali Navangul | Wg Cdr Ashok Limaye

ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहाने झेपावतो, त्याची होय.

13. Literary Tale of TV and Soap Operas | Mugdha Godbole |

आजवर एकदाही टीव्ही पाहिला नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. त्यात तो मराठी असेल तर एकही मालिका कधी बघितली नाही असा माणूस मिळणार नाही. त्यामुळेच आठवड्याचे पाच-सहा दिवस दररोज न चुकता टिव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या मालिका नेमक्या उभ्या कशा राहतात, त्या चालतात कशाच्या जोरावर आणि इतक्या मोठ्या उद्योगाची पडद्यावरची तसंच पडद्यामागची सूत्र हलवतं कोण याचा रंजक आढावा मुग्धा गोडबोले यांनी ‘टीव्ही, मालिका आणि बरंच काही…!’ या त्यांच्या नवीन पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

दव भिजली वही

‘दंव भिजली वही’ बद्दल कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात: "फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वाऱ्याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे."

12. रोहिणी निरंजनी: कथक गुरू रोहिणी भाटे जन्मशताब्दी विशेष

ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. ‘जाणिजे यज्ञकर्म’ या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अ‍ॅकॅडेमेशियन - अशा परिपूर्ण कलाकार - ‘टोटल आर्टिस्ट’- रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे रोहिणी निरंजनी