Tantramukti | तंत्र-मुक्ती
माणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित
अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे.
पण अठराव्या शतकातल्या ‘औद्योगिक क्रांती’मुळे ऊर्जांचं
अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता,
वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं.
केवळ ‘यांत्रिक’ न राहता ती चहू अंगांनी विस्तारली :
इतकी की, आज आपल्याभोवती एक ‘तंत्रावरण’ तयार
झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण
पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या
सा-या तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत
मोजतो आहोत !
वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा,
विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट
वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत.
Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे
दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर
कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून
देणारं हे पुस्तक : ‘समुचित’ तंत्रांच्या संयमित वापराकडे
जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं.
तंत्र : मुक्ती
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२४
- मुखपृष्ठ : गिरीष सहस्रबुद्धे
- आतील आलेख व चित्रे : अमेय कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : B-02-2024
More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Badalu ya Jeevanshaili (Bhag - 3) | बदलू या जीवनशैली भाग ३
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Vikasit Bharat - Amerikee ki Adhyatmik | विकसित भारत - अमेरिकी की आध्यात्मिक
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Badaluya Jeevan Shaili (Bhag - 2) | बदलू या जीवनशैली (भाग-२)
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Badaluya Jeevan Shaili (Bhag -1) | बदलू या जीवनशैली (भाग-१)
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी