दिलीप कुलकर्णी हे नाव `विकास', `पर्यावरण' ह्या विषयांशी गेल्या चार दशकांपासून अतूटपणे जोडलेलं आहे.
१९७८मध्ये अभियांत्रिकीची पदविका (DME) प्राप्त केल्यावर १९८४पर्यंत त्यांनी पुण्याला टेल्को’त नोकरी केली. शिक्षणाच्या आणि नोकरीच्या ह्या काळातच ग्रामायन, ग्राहक पंचायत ह्या संस्थांमध्ये कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं.
* १९८४मध्ये नोकरी सोडून, ते विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) ह्या संस्थेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागाचं दायित्व त्यांनी स्वीकारलं. ‘विवेक विचार’ ह्या चौमासिकाचे ते संपादक होते.
* १९९३पासून पर्यावरण ‘जगण्या’साठी कोकणातल्या एका खेड्यात ते सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.
* १९८०पासून विविध वैचारिक आणि सामाजिक विषयांवर ते व्याख्यानं देत आहेत. मराठी आणि इंग्रजीत त्यांनी विपुल स्फुट- आणि ग्रंथ-लेखन केलेलं आहे.
* २००१-२२ ह्या काळात त्यांनी ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकाचं संपादन-प्रकाशन केलं.
* २००५ पासून `निसर्गायण शिबिरां’च्या माध्यमातून ह्या विचारधारेचा ते पत्नीसह प्रसार करत आहेत.
* २०१०मध्ये त्यांनी पहिलं `पर्यावरण साहित्य-संमेलन' दापोलीत आयोजित केलं.
*** ग्रंथसंपदा
* निसर्गायण - पर्यावरणाचा मूलगामी आणि एकात्म विचार
* हसरे पर्यावरण- विद्यार्थ्यांसाठी संवाद-शैलीतलं पुस्तक
* दैनंदिन पर्यावरण - खुसखुशीत शैलीतील १०१
* कृति-कणिका
* अणु-विवेक - अणूच्या महाभयंकर, विनाशकारी वास्तवाची पुराव्यांसह माहिती
* सम्यक विकास - मानवजातीला खर्या विकासाकडे नेणार्या मार्गाचा शोध
* वेगळ्या विकासाचे वाटाडे - विकासाचा सुयोग्य मार्ग दाखविणार्या पाच विचारवंतांच्या विचारांचा परिचय
* सौर आरोग्य - व्यक्ती, परिवार, समाज आणि पर्यावरण ह्या स्तरांवरील आरोग्याचा एकात्म विचार
* ऊर्जा-संयम - स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी संयमित ऊर्जा-वापराच्या जीवनशैलीची मांडणी
* बदलू या जीवनशैली (३ भाग) - गतिमान संतुलना'च्या २० वर्षांतील निवडक संपादकीयांचं संकलन
* हरित साधक (संकलित) - स्वास्थ्य, आंतरिक विकास आणि पर्यावरण-संतुलन ह्यांसाठी जीवनशैलीत
परिवर्तन केलेल्या असामान्य सामान्यांचा परिचय
* भूतान आणि क्यूबा - ह्या दोन देशांच्या आगळ्यावेगळ्या विकासनीतीचा परिचय
* गांधी उद्यासाठी (संपादित) - आपल्यापुढच्या आजच्या समस्यांना गांधी-विचारांच्या मंथनातून उद्यासाठी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न
* स्वप्नामधील गावां... - खेड्यामधल्या २५ वर्षांच्या निसर्गस्नेही जीवनाचं अनुभवकथन आणि विश्लेषण
* विकसित भारत : अमेरिकी; की, आध्यात्मिक?- भारताच्या भावी विकासाच्या वाटेचा शोध
* विकासस्वप्न - नवी जीवनदृष्टी देणारी विचारकथा
* पर्यावरण घरोघरीं - थोडक्यात; पण, संपूर्ण, वैचारिक आणि व्यावहारिक मांडणी करणारी पुस्तिका
* विज्ञान, धर्म आणि पर्यावरण - ह्या तिनांमधील संबंधांचा ऊहापोह
* दहन की दफन (संपादित) - जिवंतपणीच करण्याचा विचार
* हापूसचे खरे रंग (संपादित) - हापूसच्या वास्तवाचं विदारक दर्शन
* आकार जीवनाला - युवांना सुयोग्य जीवनध्येयाकडे घेऊन जाणारा संवाद
* जोपासना घटकत्वाची - प्रणाली-दृष्टिकोणाची पर्यावरणाच्या परिप्रेक्ष्यात मांडणी
* अमंगल कार्यं (संपादित) - सध्याच्या कार्यांचं अमंगल स्वरूप, आणि त्यांचे मंगल पर्याय
* जीत-जीत खेळ - दैनंदिन जीवनातील सर्व कृती `जीतजीत' कशा होतील ह्याचं मार्गदर्शन
* हरित संकल्पना - १८ पर्यावरणीय संकल्पनांचा परिचय - एकादश व्रतं आणि पर्यावरण गांधीजींच्या एकादश व्रतांवर
* पर्यावरणाच्या दृष्टिकोणातून प्रकाश
* मृत्युदूत मोबाईल (संपादित)- मोबाईलच्या घातकतेचं डोळे उघडणारं दर्शन
* एंट्रॉपीची लक्ष्मणरेषा (संपादित) - निसर्गातील अत्यंत महत्त्वाच्या-पणदुर्लक्षित नियमाची माहिती
* विधायक दिवाळी (संपादित) - दिवाळीला विधायक वळण देण्यासाठीचं मार्गदर्शन
* गीते निसर्गस्नेहाची - पर्यावरणविषयक गीते
* हरित-संदेश - घोषवाक्यांसारख्या संदेशांतून पर्यावरणीय कृतींकडे लक्ष वेधणारी पुस्तिका
* A head to Nature - `निसर्गायणा’चं इंग्रजी रूपांतर
* 'Saffron' Thinking—'Green' Living
* हिंदुत्वाच्या पर्यावरणीय परिमाणाचं प्रतिपादन
* Green Messages - `हरित संदेशा’चं इंग्रजी रूपांतर
*** अन्य
* जगदीशचंद्र बसू (चरित्र)
* वैदिक गणित (भाग १ ते ४)