Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Nisargayan | निसर्गायण

Nisargayan | निसर्गायण

पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी 

झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ 

मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली 

आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. 

पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील 

असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत - 

आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, 

आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि 

केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे 

अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, 

स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे 

आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. 

ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या 

सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे ? तो 

कशानं शक्य होईल ? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि 

प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची

दिशा शोधणारं हे पुस्तक. 

ISBN: 978-81-7434-337-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९८६
  • सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१५
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : H-01-1986
M.R.P ₹ 290
Offer ₹ 218
You Save ₹ 72 (25%)

More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी