Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

शब्दोत्सव | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक अंबरीश मिश्र | चौकात उधळले मोती

अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आयोजित, "५९१ व्या दीपावली शब्दोत्सव निमित्त" संवाद राजहंसी सारस्वतांशी - लेखक अंबरीश मिश्र चौकात उधळले मोती.. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी ‘मीर’, ‘सौदा’, ‘ज़ौक़’, मिर्झा ग़ालिब, ‘मोमिन’, दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल. राजहंस प्रकाशित, चौकात उधळले मोती या पुस्तकाबद्दल ऐकुया लेखक अंबरीश मिश्र यांच्याकडून..

शब्दोत्सव २०२० | वाचनसंस्कृतीचा नवा प्रवास

अक्षरधारा, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आयोजित, शब्दोत्सव २०२० निमित्त सादर होत आहे, वाचनसंस्कृतीचा नवा प्रवास: मुद्रित पुस्तकाकडून डिजीटल रूपातल्या पुस्तकांकडे सहभाग: शिरीष शेवाळकर, राजहंस प्रकाशन मिलिंद परांजपे, ज्योत्स्ना प्रकाशन सुश्रुत कुलकर्णी, संगणक तज्ञ, लेखक

राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | संस्कृतिरंग | कल्चर शॉक

राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | संस्कृतिरंग | कल्चर शॉक 'गोष्ट राजहंसी पुस्तकाची' संस्कृतिरंग लेखिका वैशाली करमरकर आणि पत्रकार, संपादक संध्या टाकसाळे यांच्या गप्पांमधून ऐकुया संस्कृतिरंग या पुस्तकाबद्दल.

राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | मुळारंभ | डॉ. आशुतोष जावडेकर

गोष्ट राजहंसी पुस्तकाची मुळारंभ कॉलेजचं पहिलं वर्ष, नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा! ही आपल्या साऱ्यांचीच कहाणी. या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण. ती आठवण उलगडणारी कादंबरी - मुळारंभ. ऐकुया या कादंबरीमागची गोष्ट, गोष्ट राजहंसी पुस्तकाची या मालिकेमध्ये, लेखक डॉ. आशुतोष जावडेकर आणि मुलाखतकार सौरभ खोत यांच्या गप्पांमधून.

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | हेमंत गोडसे | चित्रलेखा

राजहंस प्रकाशित, भगवतीचरण शर्मा लिखित, हेमंत गोडसे अनुवादित, चित्रलेखा. संवाद राजहंसी सारस्वतांशी या मालिकेत चित्रलेखा या कादंबरीबद्दल ऐकुया अनुवादक हेमंत गोडसे यांच्याकडून. हे पुस्तक मोबाईल ॲप, वेबसाईटवर आणि राजहंसच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.