YouTube व्हिडिओ

राजहंस प्रकाशन | ऑनलाइन प्रकाशन | इंका ची देवदरी | डॉ. संदीप श्रोत्री

गूढ इंका संस्कृती, इंका साम्राज्य आणि त्यानंतर सापडलेले माचूपिच्चू शहर. या सगळ्याची कथा म्हणजे राजहंस प्रकाशनाचे इंकाची देवदरी हे नवीन पुस्तक. पाहूयात डॉ. संदीप श्रोत्री यांनी लिहिलेल्या या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. सहभाग: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे श्री. वासुदेव कुलकर्णी, कार्यकारी संपादक, दैनिक ऐक्य, सातारा डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लेखक. डॉ. शंतनू अभ्यंकर, लेखक संदीप श्रोत्री यांचे सहप्रवासी. Mr. Juvan Carlos, Guide डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन डॉ. संदीप श्रोत्री, लेखक सूत्रसंचालक: सौ. अपर्णा जोग.

राजहंस प्रकाशन । संवाद राजहंसी सारस्वतांशी । अरुण डिके । मी दाभोलकर बोलतोय

भारत हा कृषीप्रधान देश. परंतु मागील काही वर्षांत हवामानबदलाने आणि इतरही अनेक कारणांनी भारतीय शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला असल्याचे चित्र आहे. अशावेळी श्रीपाद दाभोलकरांसारखे काही जाणते कृषितज्ज्ञ मात्र या शेतकऱ्यांसाठी झटताना दिसतात. झाडाफुलांशी आणि शेतीशी नाते जपणारे दाभोलकर शेतकऱ्यांशीही तितक्याच आत्मीयतेने संवाद साधतात. इतकेच नाही तर तज्ज्ञ म्हणून ते केवळ उपदेश न देता प्रत्येक गोष्ट प्रयोगातून सिद्ध करुन दाखवतात. एका कृषितज्ज्ञाने साधलेला हा संवाद म्हणजेच 'राजहंस प्रकाशना'चे 'मी दाभोलकर बोलतोय' हे पुस्तक. या पुस्तकाची संकल्पना मांडणारे अरुण डिके यांच्याकडून ऐकूया या पुस्तकाविषयी...

राजहंस प्रकाशन | संवाद 'राजहंसी' सारस्वतांशी | अभिषेक नासिककर | समांतर

आर्किटेक्ट अभिषेक नासिककर यांचा कवितासंग्रह 'समांतर' आता सर्व वाचकांसाठी उपलब्ध आहे. या कवितसंग्रहाबद्दल अभिषेक नासिककर यांचे मनोगत.. अमूर्त रेषा भिन्न काही असमांतर विश्वास आहे मूर्त-अमूर्त तो साक्षेप अस्तित्वही समांतर आहे..

राजहंस प्रकाशन | गोष्ट 'राजहंसी' पुस्तकाची | ब्रश माइलेज | रवी परांजपे

चित्रकलेच्या क्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे रवी परांजपे! चित्रकार म्हणून त्यांचं जीवन समजून घेणं जितकं चित्रकार आणि कलाकारांसाठी महत्त्वाचं आहे, तितकंच सामान्यांसाठीही. एका नामांकित चित्रकाराचं जीवन कसं घडलं याचा आढावा घेणारं ‘ब्रश मायलेज’ हे उत्तम आत्मकथन आहे. रंगांच्या दुनियेत वावरताना आलेले रंगीबेरंगी अनुभव रवी परांजपे यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केले आहेत. नुकतीच या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने चित्रकार राहुल देशपांडे यांनी प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांची घेतलेली मुलाखत खास ‘राजहंस’च्या वाचकांसाठी...

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | डॉ. साधना शिलेदार | लोकधुनांतून रागनिर्मिती

भारतीय लोकसंगीताला मोठी परंपरा आहे. विविध प्रकारचे लोकसंगीत, लोकधुन आणि शास्त्रीय संगीत यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. शास्त्रीय संगीतातील रागनिर्मिती आणि लोकसंगीत हे एकमेकांशी निगडित आहेत. संगीतातील हेच बारकावे आणि तांत्रिक बाबी गायिका डॉ. साधना शिलेदार यांनी ‘लोकधुनातून रागनिर्मिती’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर उलगडून दाखविल्या आहेत. लोकधुन, रागनिर्मिती अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. ‘राजहंस प्रकाशना’तर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाविषयी सांगताहेत लेखिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. साधना शिलेदार ‘संवाद राजहंसी सारस्वतांशी’मधून...