YouTube व्हिडिओ
राजहंस प्रकाशन | सफर 'राजहंसी' पुस्तकांची | लढा नर्मदेचा | लेखिका - नंदिनी ओझा
नर्मदा बचाव आंदोलनाला अनेक कंगोरे आहेत. येथील आदिवासींनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ जनआंदोलन केलं. या संघर्षाची कथा समजून घेणं महत्त्वाचं आहे. ही कथा दुसरं-तिसरं कोणी सांगत नसून या लढ्यातील दोन प्रमुख आदिवासी नेते आपल्या बोलीभाषेतून ती सांगतात. लेखिका नंदीनी ओझा यांनी त्याला अतिशय उत्तम शब्दरुप दिलं असून त्यामुळे हा लढा आपल्यासारख्यांपर्यंत पोहोचतो. लढा नर्मदेचा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे आणि त्याचे प्रिबुकिंग देखील सुरु झाले आहे. त्यानिमित्त या पुस्तकाचा परिचय करून देत आहेत जेष्ठ तंत्रज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले आणि पुस्तकातील काही भागाचे वाचन करत आहेत अपर्णा जोग.
राजहंस प्रकाशन । सफर राजहंसी पुस्तकांची । जगणं कळतं तेव्हा । विद्या पोळ - जगताप
आपण मोठे होतो तसे आयुष्याची गणितं बदलतात. सुखासीन बालपण, तारुण्य मागे पडतं आणि जबाबदऱ्यांचं ओझं नकळत जगणं शिकवतं. संसाराचा गाडा ओढताना एका कोवळ्या मुलीची होणारी ओढाताण आणि त्यातून तिच्यासमोर उभं ठाकणारं जग याची गुंफण म्हणजे 'जगणं कळतं तेव्हा' ही कादंबरी. लेखिका विद्या पोळ - जगताप यांनी लिहिलेल्या या कादंबरीविषयी थोडक्यात माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पाहा.
सफर राजहंसी पुस्तकांची | पिरॅमिडच्या प्रदेशात | डॉ. अच्युत बन
पिरॅमिड ही इजिप्तची जगाला असलेली मुख्य ओळख. याबरोबरच येथील प्राचीन मंदिरे, नाईल नदी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. या संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल तर इजिप्तची सफर करण्याला पर्याय नाही. पण सगळ्यांनाच ही सफर करणं शक्य होईलच असं नाही. हेच लक्षात घेऊन लेखक डॉ. अच्युत बन यांनी 'पिरॅमिडच्या प्रदेशात' या पुस्तकातून वाचकांना इजिप्तची अप्रतिम सफर घडवली आहे. जाणून घेऊया नुकत्याच प्रकाशित झालेल्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतीबाबत...
जीवनगौरव पुरस्कार | अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ | मुलाखत | दिलीप माजगावकर | दिलीप प्रभावळकर
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकड़ून 'राजहंस' प्रकाशनाचे संचालक श्री. दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्या कार्यक्रमात श्री. दिलीप माजगावकर यांची मुलाखत ज्येष्ठ लेखक आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी घेतली.
सफर राजहंसी पुस्तकांची | श्री शिवराय VP HRD | श्री शिवराय MBA-Finance | श्री शिवराय IAS
छत्रपती शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. याबरोबरच हा जाणता राजा मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारा व्यवस्थापक होता, कुशल, धोरणी अन् यशस्वी अर्थतज्ज्ञ होता आणि सर्वात महत्त्वाचे अत्यंत कुशल प्रशासक होता. त्यांचे हे व्यवस्थापन वर्तमानातही आदर्श आणि मार्गदर्शक ठरते. तेव्हा या कौशल्यांविषयी समजून घ्यायचे असेल तर, वाचायलाच हवीत अशा डॉ. अजित आपटे यांच्या पुस्तकांविषयी...