YouTube व्हिडिओ
राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | विद्यानंद रानडे | पाण्या तुझा रंग कसा?
पाणी हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा विषय. या पाण्याचे नियोजन, सिंचन व्यवस्थापन, पाणीपुरवठा, नद्याजोड प्रकल्प, जलविद्युतनिर्मिती असे एक ना अनेक विषय. पाण्याच्या क्षेत्रात दिर्घकाळ काम केलेल्या विद्यानंद रानडे यांनी या सर्व विषयावर विस्ताराने लिखाण केले आहे. ‘पाण्या तुझा रंग कसा’ या पुस्तकाच्या माध्यमातून पाण्याविषयीच्या अनेक महत्त्वपूर्ण नोंदी यानिमित्ताने नोंदविल्या गेल्या आहेत. या पुस्तकाविषयी आपल्याला सांगत आहेत लेखक विद्यानंद रानडे...
राजहंस प्रकाशन | संवाद 'राजहंसी' सारस्वतांशी | विलास शेळके | धरणसूक्त
आपले रोजचे पाणी धरणातून येते इतकेच अनेकदा आपल्याला धरणाविषयी माहित असते. पण धरण बांधकाम करत असताना त्याला तांत्रिक, भावनिक, सामाजिक असे अनेक कंगोरे असतात. ते समजून घेतले तर त्यातील गुंतागुंत आणि आवाका लक्षात येतो. एकूणच धरणप्रकल्पामागे असणारे जीवननाट्य समजून घेणे हा एक वेगळा अनुभव आहे. धरणाशी निगडित व्यक्ती आणि त्यांचे आयुष्य समजून देणारी ‘धरणसूक्त’ ही आगळीवेगळी कादंबरी. महत्त्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून ही कादंबरी उलगडत जाते आणि धरणप्रकल्पाची सफर घडवून आणते. ‘राजहंस प्रकाशना’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या कादंबरीविषयी सांगत आहेत लेखक विलास शेळके...
राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | संजय बापट | नरभक्षकाच्या मागावर
रभक्षक प्राणी म्हटले की आपल्या अंगावर नकळत काटा येतो. पण केनेथ अँडरसन नरभक्षक वाघ आणि बिबळ्यांची अचूक शिकार करायचा. केवळ शिकारच नाही तर जंगलविषयीच्या अनेक ज्ञात-अज्ञात गोष्टींची सफर घडवणारे पुस्तक म्हणजे 'नरभक्षकाच्या मागावर'. संजय बापट यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून त्याविषयी ते काय म्हणतात ऐकूया....
राजहंस प्रकाशन | ७० व्या वर्षात पदार्पण
६९ वर्षांपासून दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारं अग्रगण्य नाव म्हणजे 'राजहंस प्रकाशन'. सृजनशील लेखकांपासून सुजाण वाचकांपर्यंत सर्वांनी राजहंसवर कायमच मनापासून प्रेम केलं, त्यामुळे हा राजहंस नवनवीन भराऱ्या घेऊ शकला. वाचनसंस्कृतीबद्दलची निष्ठा आणि रसिक वाचकांप्रति असलेला स्नेहादर जपत 'राजहंस' ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या सर्वांचा राजहंसवरील लोभ वृद्धिंगत होवो, हेच मागणे.
राजहंस प्रकाशन | सफर राजहंसी पुस्तकांची | गुरुत्त्वीय तरंग
आइन्स्टाइनच्या वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे गुरुत्त्वीय तरंगांचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. विश्वाला जाणून घेण्यासाठी मानवाला आणखी एक खिडकी पुरवणारे विश्वदर्शनाचे नवे साधन म्हणजेच गुरुत्वीय तरंग. शास्त्रीय भाषा मराठीमध्ये सोपे करून सांगणे वाटते तितके सोपे नाही. पण डॉ. पुष्पा खरे आणि अजित केंभावी यांनी हे शक्य केले आहे. राजहंस प्रकाशनाच्या 'गुरुत्वीय तरंग' या पुस्तकाचे सार सांगणारा व्हिडीओ खास वाचकांसाठी...