YouTube व्हिडिओ
पुत्र व्हावा ऐसा | माणिक कोतवाल
जगद्विख्यात मूलकण वैज्ञानिक डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या नेतृत्त्वाखाली जगभरातील चारशे शास्त्रज्ञांच्या गटाला 'डब्ल्यू बोसॉन' या मूलकणाचे वस्तुमान अधिक अचूकतेने मोजण्यात यश आले आहे. कण भौतिकशास्त्राच्या स्टॅंडर्ड मॉडेलने सुचवलेल्या वस्तुमानापेक्षा डॉ. कोतवाल यांच्या गटाने मोजलेले वस्तुमान अधिक आहे. हे संशोधन ८ एप्रिल २०२२ च्या 'सायन्स' नियतकालिकात मुखपृष्ठ कथा महणून प्रसिद्ध झाले. या सर्व यशाबद्दल डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या मातोश्री माणिक कोतवाल यांनी 'राजहंसी' वाचकांशी संवाद साधला आहे.
म्हणी आणि वाक्प्रचार | डॉ. अरुण जोशी
'म्हणी अन् वाक्प्रचारांतून केवळ शब्दांचा अर्थ उलगडत नाही, त्यात उमटत असते भाषेचे, संस्कृतीचे, लोकजीवनाचे, परंपरेचे प्रतिबिंब. मराठी भाषेतील हा समृद्ध ठेवा वाचकांना सादर करणारा संग्रह म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार.. 'राजहंस' प्रकाशित आणि डॉ. अरुण जोशी लिखित म्हणी आणि वाक्प्रचार या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन या व्हिडिओमार्फत संपन्न होत आहे. या निमित्ताने ज्येष्ठ लेखिका वासंती फडके आणि लेखक डॉ. अरुण जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. अपर्णा जोग यांनी निवेदन केले आहे व वासंतीताई फडके यांच्या मनोगताचे वाचन केले आहे.
दोन खिडक्या भाग १, २ आणि ३ मोफत मिळवा | 'राजहंस सत्तर-पार' योजना
'राजहंस सत्तर-पार' योजना
राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री. दिलीप माजगावकर यांची प्रकट मुलाखत. मुलाखतकार - ज्येष्ठ संपादक प्रशांत दीक्षित आणि सारंग दर्शने.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील खास क्षण | ७५ सोनेरी पाने | अविनाश धर्माधिकारी
७५ सोनेरी पाने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !