YouTube व्हिडिओ
राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकांची | करिअर कसं निवडावं ? | डॉक्टरच व्हायचंय
करियर निवडणे हा सध्या तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पुढील एक महत्वाचा प्रश्न झाला आहे. आपले ध्येय कोणते, ते गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी यांसारख्या सोप्या वाटणाऱ्या परंतु काहिशा जटिल प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉ. श्रीराम गीत यांनी आपल्या 'करियर कसे निवडावे' या पुस्तकातून केला आहे. याबरोबरच डॉक्टर होण्यासाठी नेमके काय करावे लागते याविषयी सांगण्यासाठी त्यांनी 'डॉक्टर व्हायचंय' या पुस्तकाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने या क्षेत्राविषयी महिती दिली आहे. या दोन्ही पुस्तकांची गोष्ट सांगताहेत लेखक डॉ. श्रीराम गीत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत राजहांसचे संपादक डॉ. सदानंद बोरसे.
राजहंस प्रकाशन | महिला दिन विशेष | राजहंसी लेखिकांचा अंतर्भाव | सोनाली कुलकर्णी
राजहंस प्रकाशनाच्या प्रतिभावान लेखिकांच्या मांदियाळीमध्ये प्रतिभा रानडे, पुष्पा भावे, वीणा गवाणकर अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अनेक लेखिकांचा सहभाग आहे. पण या महिलादिनानिमित्त आम्ही खासकरून आजच्या पिढीतील लेखिकांचा आवर्जून अंतर्भाव करीत आहोत. विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व अधोरेखित करत असताना लेखिका म्हणूनही ‘ती’ स्वत:ला सिद्ध करत आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नेमक्या विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘ति’ची लेखिका म्हणूनही ओळख आहे. ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऐकूया अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी हिच्या सो.. कुल.. या पुस्तकाविषयी...थेट तिच्याकडूनच...
राजहंस प्रकाशन | तीन चाकांवरील ज्ञानदूत | महिला दिन विशेष
लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली असताना हताश न होता, स्वतःच्या हिमतीवर, आई वडिलांच्या आशीर्वादाने खंबीरपणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रिक्षाचालिकेचे काम स्वीकारणाऱ्या दिपाली कडू यांच्याबद्दल राजहंस प्रकाशनाला आदर आणि कौतुक वाटते. राजहंस प्रकाशनाच्या 'तीन चाकांवरील ज्ञानदूत' या उपक्रमामध्ये आजपासून दिपाली कडू यांनी सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या राजहंस प्रकाशनाकडून दिपाली कडू यांना हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून स्वागत! ऐकुया त्यांचे मनोगत..
राजहंस प्रकाशन | महिला दिन विशेष सप्ताह | राजहंसी लेखिकांचा अंतर्भाव | विद्या पोळ - जगताप
राजहंस प्रकाशनाच्या प्रतिभावान लेखिकांच्या मांदियाळीमध्ये प्रतिभा रानडे, पुष्पा भावे, वीणा गवाणकर अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अनेक लेखिकांचा सहभाग आहे. पण या महिलादिनानिमित्त आम्ही खासकरून आजच्या पिढीतील ७ लेखिकांचा आवर्जून अंतर्भाव करीत आहोत. विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व अधोरेखित करत असताना लेखिका म्हणूनही ‘ती’ स्वत:ला सिद्ध करत आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नेमक्या विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘ति’ची लेखिका म्हणूनही ओळख आहे. आज ऐकूया लेखिका विद्या पोळ - जगताप यांच्या जगणं कळतं तेव्हा या पुस्तकाविषयी...थेट त्यांच्याकडूनच...
राजहंस प्रकाशन | महिलादिन विशेष सप्ताह | राजहंसी लेखिकांचा अंतर्भाव | प्रा. डॉ. मृदुला बेळे
राजहंस प्रकाशनाच्या प्रतिभावान लेखिकांच्या मांदियाळीमध्ये प्रतिभा रानडे, पुष्पा भावे, वीणा गवाणकर अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अनेक लेखिकांचा सहभाग आहे. पण या महिलादिनानिमित्त आम्ही खासकरून आजच्या पिढीतील ७ लेखिकांचा आवर्जून अंतर्भाव करीत आहोत. विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व अधोरेखित करत असताना लेखिका म्हणूनही ‘ती’ स्वत:ला सिद्ध करत आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नेमक्या विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘ति’ची लेखिका म्हणूनही ओळख आहे. आज ऐकूया लेखिका प्रा. डॉ. मृदुला बेळे यांच्या 'कथा अकलेच्या कायद्याची', कोरोनाच्या कृष्णछायेत' आणि 'अशीही एक झुंज' या पुस्तकांविषयी... थेट त्यांच्याकडूनच...