Javed Akhtar : Navya Suryachya Shodhat | जावेद अख़्तर : नव्या सूर्याच्या शोधात

Javed Akhtar : Navya Suryachya Shodhat | जावेद अख़्तर : नव्या सूर्याच्या शोधात

जावेद अ़ख्तर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. 

‘सलीम-जावेद’ या जोडगोळीनं एके काळी एकाहून एक 

यशस्वी चित्रपटांची माळ लावली. त्यानंतरही जावेद यांच्या 

लेखणीतून किती तरी गाजलेल्या पटकथा अन् कैक संस्मरणीय 

चित्रपटगीतं उमटली. ‘तरकश’ अन् ‘लावा’ या कवितासंग्रहांमध्ये 

बुद्धी अन् मन, विचार अन् भावनांचा समन्वय त्यांनी साधला. 

त्यांची चित्रपटकारकीर्द यशानं झळाळणारी, तर त्यांची वेळोवेळी 

केलेली वक्तव्यं वादाचा धुराळा उडवणारी. आपलं भारतीयत्व, 

आपला विवेकवाद, आपली धर्मनिरपेक्षता, आपलं ‘एथेइस्ट’ असणं 

या सर्वांचा जाहीर स्वीकार करणारे, त्या सार्‍याचा सार्थ अभिमान 

बाळगणारे अन् त्यानुसार हिरिरीनं वागणारे जावेदजी. 

त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं चरित्र.

ISBN: 978-93-95483-15-5
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २०२३
  • मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५'" X ८.५"
  • बुक कोड : A-04-2023
M.R.P ₹ 270
Offer ₹ 203
You Save ₹ 67 (25%)

More Books By Mangala Godbole | मंगला गोडबोले