
Bokya Satbande Part 8 to 10 | बोक्या सातबंडे (भाग ८ ते १०)
भाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून
`हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, `चौकटराजा' मधल्या नंदू आणि `श्रीयुत गंगाधरे
टिपरे'तल्या आबांपासून `लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ.
बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! `गुगली',
`नवी गुगली', `हसगत', `कागदी बाण' व `झूम'नंतरचं
प्रभावळकरांचं `बोक्या सातबंडे' हे एक झक्कास पुस्तक !
प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१२
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०२३
- मुखपृष्ठ : पुंडलिक वझे
- राजहंस क्रमांक : H-04-2012
More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर


