Bokya Satbande (Bhag 4-5) | बोक्या सातबंडे : (भाग- ४ ते ५)

Bokya Satbande (Bhag 4-5) | बोक्या सातबंडे : (भाग- ४ ते ५)

'भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली, नवी गुगली, हसगत, कागदी बाण व झूम नंतरचं प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : एप्रिल २००७
सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१४
मुखपृष्ठ : पुंडलिक वझे'

M.R.P ₹ 260
Offer ₹ 234
You Save
₹ 26 (10%)

More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर