वर्षा गजेंद्रगडकर या विशेषतः पर्यावरण या विषयावर लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत.
* बालसाहित्य , अनुवाद, ललित आणि पर्यावरण विषयक लेखन अशा विविध क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे सातत्याने लेखन करत आहे.
* आजपर्यंत पस्तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
* नवसाक्षर वर्गासाठीही अनेक पुस्तिकांचे लेखन केले आहे.
* राष्ट्रीय साक्षरता मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातल्या नवसाक्षरांसाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सहभाग होता.
* पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या काही स्वयंसेवी संस्थांसाठी सल्लागार-संपादक म्हणून निगडित आहे.
* महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा या पुण्यातल्या नामवंत शैक्षणिक संस्थेच्या नियामक मंडळावर सभासद म्हणून काम करते आहे.
* डॉ. रा.चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र या संस्थेची सचिव म्हणून कार्यरत आहे.
*** प्रकाशित साहित्य
* अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर)
* आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
* उजेड आणि सावल्या (सदर लेखन संग्रह; दैनिक पुण्यनगरीत प्रसिद्ध झालेल्या ४० लेखांचा संग्रह)
* उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
* ऐल पैल
* खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
* खारफुटी, प्रवाळभिंती आणि सागरीसृष्टी व्यवस्था
* गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
* छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
* जैववैविध्य - संकल्पना
* दोन क्षितिजे (कथासंग्रह)
* निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
* भारतातील पवित्र वनस्पती (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम)
* भारतीय अस्मितेची प्रतीके : या पुस्तकात राष्ट्रगीत-जनगणमन, राष्ट्रीय गीत - वंदे मातरम्, राष्ट्रध्वज - तिरंगा, राष्ट्रीय चिन्ह - राजमुद्रा, राष्ट्रीय बोधवाक्य - सत्यमेव जयते, राष्ट्रभाषा - हिंदी, राष्ट्रीय पक्षी - मोर, राष्ट्रीय पुष्प - कमळ, राष्ट्रीय वृक्ष - वड, राष्ट्रीय फळ - आंबा, राष्ट्रीय प्राणी - वाघ आणि राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन या राष्ट्रीय प्रतीकांचा अतिशय सविस्तर वेध घेण्यात आला आहे. हा वेध घेताना या प्रतीकांचा इतिहास, राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवडण्यामागची कारणं, याची माहिती मिळते.
* भारताच्या लोकमाता
* भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे
* बुजगावण्यांची वरात
* बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखक - जेम्स लीझर)
* लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - अरुणा ढेरे)
* विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
* सुशीलाच्या रांगोळ्या
* स्त्री आणि पर्यावरण
*** पुरस्कार
* सहा पुस्तकांना महाराष्ट्र शासन,
* महाराष्ट्र साहित्य परिषद,,
* पुणे मराठी ग्रंथालय
* मराठी भाषा संवर्धन समिती
* भारतीय पर्यावरण या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)
यासारख्या प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.