Rajhans Podcasts
31. पुनश्च हनिमून | Sandesh Kulkarni | Amruta Subhash
ही गोष्ट आहे सुहास आणि सुकन्याची. त्यांच्या पहिल्या लग्नाच्या दुसऱ्या हनिमूनची. पण लग्नानंतर सात वर्षांनी माथेरानला त्याच हॉटेलमध्ये पोचल्यावर बरंच काही विस्कटलंय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करतीय. पण नकळत उसवत चाललेल्या नात्याची ही गोष्ट फक्त त्या दोघांची रहात नाही. पस्तिशी-चाळीशीतल्या अनेक जोडप्यांच्या जगण्याशी-सहजीवनाशी जाऊन ती भिडते. या कथेचा रंगमंचीय अविष्कार म्हणजे संदेश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित पुनश्च हनिमून हे नाटक. या विलक्षण वेगळ्या धाटणीचं नाटक नुकतंच पुस्तक रूपात राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. यानिमित्तानं संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्यासोबत रंगलेला संवाद राजहंसी मोहोर पॉडकास्टद्वारे घेऊन आलोय.
30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki
पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.
29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा!
प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.