Aloukik Antarctia | अलौकिक अंटार्क्टिका
निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि
साहस करण्याची मनाची तयारी या बळावर
कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य
शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते.
एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला
जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल.
तो काळ आता मागे पडला आहे.
मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी
इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून
स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते.
त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच;
पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात.
त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता
एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो
ISBN: 978-81-19625-66-6