Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

Mi...Alladiyakhan | मी...अल्लादियाखां

मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब 

जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते 

जणू ‘गायनाचे गौरीशंकर' ! 

त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी 

डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. 

ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' 

या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. 

त्यातून वाचकापुढे उलगडत जातं 

कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं 

खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, 

कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं 

नाजूक, जरतारी विणकाम. 

विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या 

व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. 

एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं 

हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे 

रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना 

लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.

ISBN: 978-93-48736-25-3
  • बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२५
  • मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे : ज्ञानेश चिरमुले
  • मुखपृष्ठ डिझाइन : मयूर प्रकाश कुलकर्णी
  • राजहंस क्रमांक : H-02-2025
M.R.P ₹ 500
Offer ₹ 450
You Save ₹ 50 (10%)