Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद

Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद

'स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तिनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटका करणारा हा ग्रंथ... सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय? त्यांनी हिंदुराष्ट्राचा वा तथाकथित द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे नक्की कशाचा पुरस्कार केला होता? त्यांना अभिप्रेत असणा-या राज्यघटनेचा पाया कोणता होता – धर्मग्रंथ की अद्ययावत बुद्धिप्रामाण्य? त्या घटनेनुसार अहिंदूंना कोणकोणते हक्क मिळणार होते? या व अशाच इतर असंख्य प्रश्नांची साधार, मूलगामी उत्तरे देणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ भारतीय राजकारणाचे धागेदोरे समजून घेऊ इच्छिणा-या सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे. '

ISBN: 978-81-7434-251-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २००३
  • सद्य आवृत्ती : एप्रिल २०१३
  • मुखपृष्पठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)

More Books By Sheshrao More | शेषराव मोरे