Kashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti) | काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)

Kashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti) | काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)

काश्मीर :एक शापित नंदनवन 

याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. 

ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; 

अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! 

या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, 

याचे सत्यकथन हा आहे. 

* तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, 

हा प्रवाद खरा आहे काय ? 

* त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? 

* संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? 

* विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? 

* तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? 

* घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? 

* पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? 

* तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? 

या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम 

पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी 

ते समजून घ्यावेच लागेल. 

कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक 

राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे ‘शापित नंदनवन’ ठरले आहे ! 

ISBN: 978-81-7434-203-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २००१
  • सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१८
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : G-01-2001
M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save ₹ 35 (10%)

More Books By Sheshrao More | शेषराव मोरे