Gata Rahe | गाता रहे..
संगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा,
हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही.
जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य
अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले,
तर - ‘धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'.
संगीत जुने असो वा नवे, ‘आपले' असो वा ‘त्यांचे'
शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत,
त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने
वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास!
नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची
आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे
चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -
- आय.एस.बी.एन. नं. : 978-93-90324-78-1
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०२३
- चित्रकार : चंदमोहन कुलकर्णी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- बुक कोड : K-03-2023
- पृष्ठ संख्या : २७८
- वजन : ५४३