Chirtarun Swar - Asha Bhosale | चिरतरूण स्वर : आशा भोसले
आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची...
ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता!
आर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी.. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं,
नाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं...
गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श
झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर
आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात!
आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस
हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद...
अन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा!
हिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी,
चुकवू नये अशी मैफल...
ISBN: 978-81-19625-50-5
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२४
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- सुलेखन : बाबू उडुपी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८ .५"
- बुक कोड : L-03-2024