Aawajacha Awaliya - Kishor Kumar | आवाजाचा अवलिया - किशोर कुमार
हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं
हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार.
एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात.
‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर
‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता.
‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर
‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा.
या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर
आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल.
कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती?
सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं?
या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील
किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण...
ते वाचून तुम्हाला मूड येईलच,
तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड.
तो स्कॅन करा नि गाणं ऐकण्याचा आस्वादही घ्या..
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२४
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- मुखपृष्ठ सुलेखन : बाबू उडुपी
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८ .५"
- बुक कोड : J-06-2024