
Gargi Ajun Jivant Ahe | गार्गी अजून जिवंत आहे
सा-या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे,
त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं
प्रशस्तिपत्रक देणा-या गार्गीचा काळ खूप मागे पडला.
पण गार्गी अजून जिवंत आहे.
एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा
खेडेगावात जन्मलेली गुलाब !
वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला,
`अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही ?’
नुसता प्रश्न विचारून गुलाब थांबली नाही, तर सा-या विरोधाला
मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला.
रसुलाबाद घाट !
तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सा-या घाटावर दरारा आहे. भले भले
ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहे. तिच्याकडे पाहताना
गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं,
कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली ?
गार्गी अजून जिवंत आहे...
- बाईडिंग : कार्ड बाईडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २००२
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०२२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : B-01-2002
More Books By Mangala Athalekar | मंगला आठलेकर


