जन्मतारीख: १२ ऑगस्ट १९६२
* शिक्षण: बी.एस्सी, बी.जे, एमएमसीजे, बी.ए
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातून संचालक म्हणून निवृत्त.
* शासनाचे मुखपत्र असलेल्या "लोकराज्य" मासिक व "आपले मंत्रालय" आणि "महाराष्ट्र वार्षिकी" या नियतकालिकांचे संपादक.
* तीन मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी आणि साहित्य संस्कृती मंडळाचे सचिव म्हणून कार्य. सध्या राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य.
* करिअर गायडन्ससवर गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून सातत्याने लिखाण व मार्गदर्शन.
* गेल्या दहा वर्षापासून लोकसत्ता दैनिकात, ‘मार्ग यशाचा’ या महामालिकेसाठी एप्रिल ते जून हे तीन महिने दररोज लेखन. करिअर गायडन्सवरील नऊ पुस्तके प्रकाशित. बालवाड्.मयाची आठ पुस्तके प्रकाशित. साक्षरोत्तर अभियानांतर्गत नवसाक्षरांसाठी ५० पुस्तकांचे संपादन.
*** करिअर मार्गदर्शन पुस्तके-
१) दहावी - बारावी नंतर काय?
२) क्लास वन अधिकारी बनण्याचा राजमार्ग
३) करिअरच्या दिशा (पदवी परीक्षेनंतर काय?)
४) समृध्दीच्या दिशेने करिअर
५) शिष्यवृत्ती हवी आहे काय ?
६) थिंक डिफरंटली बी सक्सेसफुल
७) अचूक दिशा, सुयोग मार्ग (भाग एक आणि भाग दोन)
८) स्मार्ट करिअर,उज्जवल भविष्य (भाग एक आणि भाग दोन)
९) मराठी भाषा: संधी आहे सर्वत्र, ही पुस्तके प्रकाशित.
*** बाल वाड.मय -
१) खुल जा टिम टिम
२) विचार करणारा गाढव
३) यश कसं मिळतं?
४) भूताई लोटण
५) बेअर्ड काका, पोपट आणि टारझन
६) आम्ही स्मार्ट मुलं
७) मूषक स्वामींचा दंगा,राणीला इंगा
८) मित्र हरवले
९ ) १६९५ स्मार्ट रोबो, औरंगजेब आणि ए.आय.
*** विविध पुरस्कारांनी सन्मानित
१) मुंबई मराठी साहित्य संघ-उत्कृष्ट बालवाङमय पुरस्कार (आम्ही स्मार्ट मुलं) -२०२३
२) वैशिष्ट्यपूर्ण बालकथा लेखनासाठी मातोश्री स्नेहप्रभा तौर कृतज्ञता पुरस्कार - २०२३
३) मुंबई मराठी पत्रकार संघ-शैक्षणिक मार्गदर्शनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार -२०२३
४) राजहंस प्रकाशन कुमार विज्ञान कादंबरी स्पर्धा प्रथम पुरस्कार - २०२२
५) पत्रपंडित पां.वा.गाडगीळ स्मृती सामाजिक-आर्थिक विकास लेखन लोकमत पुरस्कार - २०१८
६) राज्य वाड्.मय पुरस्कार-उत्कृष्ट बालकादंबरी सानेगुरुजी पुरस्कार - २०१४
७) पत्रपंडित पां.वा.गाडगीळ स्मृती सामाजिक-आर्थिक विकास लेखन लोकमत पुरस्कार - २००९
८) यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखन पुरस्कार २००२ (राज्य शासनाचा पुरस्कार)
९) यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई – १९९५)
१०) यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई - १९९३)
११) विकास वार्ता पुरस्कार -१९९३ (राज्य शासनाचा पुरस्कार)
१२) विकास वार्ता पुरस्कार -१९९१ (राज्य शासनाचा पुरस्कार)
१३) मा.गो.वैद्य तरुण भारत पुरस्कार - १९८९
१४) लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार - १९८८-८९
१५) लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार - १९८७-८८