YouTube व्हिडिओ
राजहंस प्रकाशन | ७० व्या वर्षात पदार्पण
६९ वर्षांपासून दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारं अग्रगण्य नाव म्हणजे 'राजहंस प्रकाशन'. सृजनशील लेखकांपासून सुजाण वाचकांपर्यंत सर्वांनी राजहंसवर कायमच मनापासून प्रेम केलं, त्यामुळे हा राजहंस नवनवीन भराऱ्या घेऊ शकला. वाचनसंस्कृतीबद्दलची निष्ठा आणि रसिक वाचकांप्रति असलेला स्नेहादर जपत 'राजहंस' ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या सर्वांचा राजहंसवरील लोभ वृद्धिंगत होवो, हेच मागणे.
राजहंस प्रकाशन | सफर राजहंसी पुस्तकांची | गुरुत्त्वीय तरंग
आइन्स्टाइनच्या वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे गुरुत्त्वीय तरंगांचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. विश्वाला जाणून घेण्यासाठी मानवाला आणखी एक खिडकी पुरवणारे विश्वदर्शनाचे नवे साधन म्हणजेच गुरुत्वीय तरंग. शास्त्रीय भाषा मराठीमध्ये सोपे करून सांगणे वाटते तितके सोपे नाही. पण डॉ. पुष्पा खरे आणि अजित केंभावी यांनी हे शक्य केले आहे. राजहंस प्रकाशनाच्या 'गुरुत्वीय तरंग' या पुस्तकाचे सार सांगणारा व्हिडीओ खास वाचकांसाठी...
राजहंस प्रकाशन | सफर 'राजहंसी' पुस्तकांची | लढा नर्मदेचा | लेखिका - नंदिनी ओझा
नर्मदा बचाव आंदोलनाला अनेक कंगोरे आहेत. येथील आदिवासींनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ जनआंदोलन केलं. या संघर्षाची कथा समजून घेणं महत्त्वाचं आहे. ही कथा दुसरं-तिसरं कोणी सांगत नसून या लढ्यातील दोन प्रमुख आदिवासी नेते आपल्या बोलीभाषेतून ती सांगतात. लेखिका नंदीनी ओझा यांनी त्याला अतिशय उत्तम शब्दरुप दिलं असून त्यामुळे हा लढा आपल्यासारख्यांपर्यंत पोहोचतो. लढा नर्मदेचा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे आणि त्याचे प्रिबुकिंग देखील सुरु झाले आहे. त्यानिमित्त या पुस्तकाचा परिचय करून देत आहेत जेष्ठ तंत्रज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले आणि पुस्तकातील काही भागाचे वाचन करत आहेत अपर्णा जोग.
राजहंस प्रकाशन । सफर राजहंसी पुस्तकांची । जगणं कळतं तेव्हा । विद्या पोळ - जगताप
आपण मोठे होतो तसे आयुष्याची गणितं बदलतात. सुखासीन बालपण, तारुण्य मागे पडतं आणि जबाबदऱ्यांचं ओझं नकळत जगणं शिकवतं. संसाराचा गाडा ओढताना एका कोवळ्या मुलीची होणारी ओढाताण आणि त्यातून तिच्यासमोर उभं ठाकणारं जग याची गुंफण म्हणजे 'जगणं कळतं तेव्हा' ही कादंबरी. लेखिका विद्या पोळ - जगताप यांनी लिहिलेल्या या कादंबरीविषयी थोडक्यात माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पाहा.
सफर राजहंसी पुस्तकांची | पिरॅमिडच्या प्रदेशात | डॉ. अच्युत बन
पिरॅमिड ही इजिप्तची जगाला असलेली मुख्य ओळख. याबरोबरच येथील प्राचीन मंदिरे, नाईल नदी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. या संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल तर इजिप्तची सफर करण्याला पर्याय नाही. पण सगळ्यांनाच ही सफर करणं शक्य होईलच असं नाही. हेच लक्षात घेऊन लेखक डॉ. अच्युत बन यांनी 'पिरॅमिडच्या प्रदेशात' या पुस्तकातून वाचकांना इजिप्तची अप्रतिम सफर घडवली आहे. जाणून घेऊया नुकत्याच प्रकाशित झालेल्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतीबाबत...