Priya Palak | प्रिय पालक
Editor:
Karuna Gokhale | करुणा गोखले
मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ !
मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना,
पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था,
ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना,
ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं,
हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ?
प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे.
त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक
एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
ISBN: 978-81-19625-06-2
- पहिली आवृत्ती : मार्च २०२४
- मुखपृष्ठ, आतील मांडणी : गिरीश सहस्रबुद्धे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड : B-08-2024