Mulanche Chitampallee | मुलांचे चितमपल्ली
तुम्ही म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश आहात, परंतु माहिती म्हणजे ललित साहित्य नव्हे. वनशास्त्र हा शास्त्रीय विषय असल्यानं सर्वच लेखन ललित पद्धतीनं लिहिता येईल का, ह्याचा विचार करा. ह्या शास्त्रातील विद्वानांची जंगलशास्त्राविषयीची विधानं उद्धृत करून लिहा. तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला माणसांचा संदर्भदेऊन लिहा, म्हणजे निर्मितीच्या पातळीवर जाणारं असं लेखन वाचकांना नक्कीच आवडेल. भाषा मात्र सोपी वापरा.' व्यंकटेश माडगूळकरांच्या या सल्ल्याला प्रतिसाद देऊन चितमपल्लींनी आपले सर्व साहित्य सर्व स्तरांवरील वाचकांना आणि अभ्यासकांनाही रंजक, माहितीप्रद व उपयुक्त ठरेल अशा सोप्या भाषेत लिहिले आणि समाजमान्यता मिळवली. आपल्या आयुष्यातील पासष्ट वर्षे जंगलात काढत तपस्व्याच्या निग्रहाने जंगलातील प्राणिजीवनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणाऱ्या मारुती चितमपल्लींचा परिचय विशेषकरून कुमारवयातील मुलामुलींना करून द्यावा, त्यांच्यामध्ये पशू, पक्षी, कीटक, फुलपाखरे, वनस्पती ह्यांच्याबद्दल ओढ निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, अशा हेतूंनी लिहिलेले वेधक चरित्र.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- पहिली आवृत्ती : १८ जून मुखपृष्ठ \मुखपृष्ठ व आतील चित्रे : संतोष घोंगडे राजहंस क्रमांक : F-06-2026 (1254)
More Books By Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
Chara Kha Panee Pya An Bhurrr s s s | चारा खा, पाणी प्या अन भुर्र S S S
Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर