
Indira Gandhi | इंदिरा गांधी
बालपणापासुन ती होती
अबोल, एकाकी.
आईची आर्त व्याकुळता नि
पित्याची तेजस्वी भव्यता यांचा
नाद तिच्या मनात घुमत राहिला.
स्वत:च्या घरी देशाचा घडत
असलेला इतिहास ती
लहानपणापासून पहात होती
आणि पहाता पहाता तिनंही
इतिहास घडविला.
बांगला देश स्वातंत्र्यसंग्रामाच्या
वेळी लखलखत्या दुर्गेचा
अवतार धारण करून इतिहासाचं
सोनेरी पर्व घडविणा-या इंदिरेनंच
आणीबाणीचा काळाकुट्ट
अध्यायही लिहिला.
स्वयंभू,कठोर, खंबीर, प्रसंगी
वादळ उठवणारी नि झेलणारी
इंदिरा पुढे मात्र हळवी, परावलंबी,
अंधश्रध्दाळू बनली.
तिच्या मनातील आंदोलनाचा,
स्वप्नांच्या उदयास्ताचा, तिच्या
कोंडलेल्या श्र्वासाचा, खाजगी
जीवनातील अज्ञात घटनांचा
भारावून टाकणारा प्रवास.
ISBN: 978-81-7434-093-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५ "
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर १९९३
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०२४
- मुखपृष्ठ व आतील सजावट : कमल शेडगे
- वेष्टनावरील व आतील बहुसंख्य छायाचित्रे : रघु रॉय
- राजहंस क्रमांक : J-01-1993
- निर्मिती साहाय्य : सुनील कर्णिक