Vastragatha | वस्त्रगाथा
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.
- पहिली आवृत्ती : १२ ऑक्टोबर २०२४ -विजयादशमी
- मुखपृष्ठ : विकास गायतोंडे
- साहाय्य : पियुष जगताप
- चित्रे, संकल्पना आणि संरचना : विनय नारकर , पियुष जगताप
- चित्रकार : मीनाक्षी रामपुरे
- सुलेखन : विनायक घाटगे
- छाया चैतन्य लांजे
- बाईंडिंग -हार्ड बाईंडिंग
- आकार : ८ .५'" X १० .५"
- बुक कोड -J-02-2024