 
        
                माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ , या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत.बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत.
***  शिक्षण
शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे घेतले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या.
***  कारकीर्द
*  जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, समर नखाते, मोहन गोखले, अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा.
*  गोविंद निहलानी, अरुण खोपकर, टी. एस. रंगा, वैभव आबनावे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय.
*  जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर, आनंद मोडक या संगीतकारांच्या रचनांचे गायन
*  माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही ज्ञानेश्वरांची रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले.
* **  कादंबरी
*  सिल्व्हर स्टार (मराठी, इंग्रजी) (२००९)
***  एकांकिका
*  कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स 
*  चौकशी व इतर एकांकिका (१९९०)
***  चरित्रे
*  पिकासो (१९८८) 
***  अनुवादित 
*  झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो)
*  त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : गी द मोपासां)
*  न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : मोलिएर)
*  मोतिया (लोककथा)
*  वेटिंग फॉर गोदो (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : सॅम्युएल बेकेट)
*  व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : आयर्व्हिंग स्टोन)
*  हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन)
***  फ्रेंचमध्ये भाषांतरे
*  बलुतं (१९९०) (मूळ लेखक : दया पवार )
*  स्त्री-पुरुष तुलना (२००५) (मूळ लेखक : ताराबाई शिंदे )
*  बालसाहित्य व कुमारसाहित्य[ संदर्भ हवा ]
*  आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५)
*  घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२)
*  आता का? (मराठी, हिंदी) (२०२२)
*  नाही माहित (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२)
*  नदीवर (मराठी, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच) (२०२२)
*  आनंदी रोप (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२)
*  मुखवटा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२)
*  ठिपके (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२)
*  रेषा (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२)
*  एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५)
*  काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२)
*  किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९)
*  खजिना (२०१३)
*  जादूगार आणि इतर कथा (१९९९)
*  त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२)
*  परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४)
*  बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२)
*  मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५)
*  यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९)
*  राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५)
*  राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३)
*  लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९)
*  शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४)
*  शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४)
*  शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९)
*  सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९)
*  संपादन/संकलन/शैक्षणिक[ संदर्भ हवा ]
*  माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४)
*  वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१)
*  कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२)
*  चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी)
*  लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०)
***  माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते
*  अगं अगं सखूबाई
*  कुणी धावा गं धावा
*  डेरा गं डेरा
*  देवळाच्या दारी
*  देवाचा गं देवपाट
*  देवा सूर्यनारायणा
*  पंढरीची वाट
*  माझी भवरी गाय
*  रात पिया के संग जागी रे सखी
*  सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश)
*  हमामा रे पोरा हमामा
*  निळे हे व्योम
*  क्षण एक मना
*  ध्वनी फिती
*  अमृतगाथा
*  कधी ते
*  कधी हे
*  प्रीतरंग
*  शेवंतीचं बन
*  साजणवेळा
***  पुरस्कार
*  केशवराव कोठावळे पारितोषिक (१९८९)
*  समग्र बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)
*  द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[२]
*  टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६
            
 
                             
      
                                 
             
             
             
            