Tatayan: Ek Poladi Udyamgatha | टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा
'टाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!'
ISBN: 978-81-7434-889-0
- पहिली आवृत्ती - जानेवारी २०१५ / सद्य आवृत्ती - जानेवारी २०२४
- चित्रकार - विकास गायतोंडे'
- बाईंडिंग - हार्ड बाईंडिंग
- आकार - ५.५" X ८.५"
- बुक कोड - A-02-2015