Sahebachya Deshat | साहेबाच्या देशात
भक्तीच्या नऊ प्रकारांत शेवटचा टप्पा असतो अमूर्त पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा, असे करत करत नवव्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची, असा. पर्यटनाचंही असंच असावं बहुधा, पहिला टप्पा हातात प्रेक्षणीय स्थळांची यादी घेऊन धावपळ करत यादीबरहुकूम एकेक स्थळ पाहिल्यावर त्या त्या नावासमोर 'टिक' करत जाण्याचा. नववा टप्पा हाती अशी कुठलीही यादी नसताना पर्यटनाचा निखळ आनंदानुभव घेण्याचा। ताज्या इंग्लंड दौऱ्यात या टप्प्याच्या खूप जवळ जाता आलं, असं म्हणता येईल. इंग्लंडचं अंतरंग उलगडून दाखवणारी अविस्मरणीय सफर !
ISBN: 978-93-48736-96-3
- संपादक - डॉ. सदानंद बोरसे मुखपृष्ठ व आतील मांडणी : राजू देशपांडे हार्ड बाउंड