Sujan Palak vhava kasa? | सुजाण पालक व्हावं कसं?

Sujan Palak vhava kasa? | सुजाण पालक व्हावं कसं?

आपली मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, यशस्वी व्हावीत... 

असं कुठल्या पालकांना वाटत नाही ? 

पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. 

जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे. 

टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात 

आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या 

आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे ? 

आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची ? 

त्याहीपुढे जाऊन पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी 

फुरसतही आज पालकांकडे नसेल, तर...? 

पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं ! 

पालक 'होणं' हे एक 'घडणं' असतं. 

आजच्या काळात पालक 'होणं' म्हणजेच 'सुजाण पालक' होणं. 

दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच, 

पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं 

म्हणजे 'सुजाण पालक' होणं ! 

'सुजाण पालकत्वाचा' हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे 

मराठीतलं अद्ययावत असं 'गाईड' पालकांच्या संग्रही असायलाच हवं. – 

पूर्वीच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या... सर्वांच्याच ! 

ISBN: 978-81-7434-640-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २००८
  • सद्य आवृत्ती : डिसेंबर २०२०
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : A-04-2008
M.R.P ₹ 275
Offer ₹ 206
You Save ₹ 69 (25%)