Patra Ani Maitra | पत्र आणि मैत्र

Patra Ani Maitra | पत्र आणि मैत्र

गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल 

करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. 

गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 

कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध 

नामवंतांशी ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ घातले असा चिंतनशील, 

भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार’. 

‘राजहंस’च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी 

आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक 

क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी 

दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे’. 

‘दिगमा’ या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे 

त्यांच्या सुह्रदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा’. 

या सा-याचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक 

अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा 

जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र

  • आय.एस.बी.एन. नं. : 978-93-95483-80-3
  • पहिली आवृत्ती : ११ नोव्हेंबर २०२३
  • चित्रकार व आतील रचना : विकास गायतोंडे
  • बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
  • आकार : ९.५ " X ६.५"
  • बुक कोड : K-01-2023
  • पृष्ठ संख्या : ३५४
  • वजन : ८७५
M.R.P ₹ 450
Offer ₹ 450
You Save ₹ 0 (0%)
Out of Stock