‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘माणूस’ साप्ताहिकात १९६६ मध्ये प्रवेश.
थोरले बंधू माणूस कार श्री.ग.माजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपादनापासून मुद्रण-वितरणापर्यंत सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या.
१९८४ पासून ‘राजहंस प्रकाशना’ची सूत्रे हाती घेतली.
सामाजिक बांधिलकीचे सजग भान, राजकारण-समाजकारण-अर्थकारणापासून ललित साहित्यापर्यंत आणि संगीत-नृत्य-नाटय-चित्रपट-चित्रकला-शिल्पकला यांपासून तत्त्वज्ञान-विज्ञान-पर्यावरणापर्यंत अनेक विषयांमध्ये रस. या साऱ्यांचे ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांमध्ये प्रतिबिंब.
नव्या, ताज्या दमाच्या लेखकांना प्रोत्साहन. कायम नव्या विषयांचा शोध आणि हाताळणी. वाचकांच्या आवडीची उत्तम जाण. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत मानलेली निर्मितीमूल्ये या साऱ्यांची सुयोग्य सांगड घातलेल्या पुस्तकांचे वाचकांकडून भरभरून स्वागत.
‘राजहंस प्रकाशना’च्या कायमस्वरूपी प्रतिनिधींची महाराष्ट्रात विविध ठिकाणी नेमणूक. त्या योगे पुस्तक वितरणाचे महाराष्ट्रभर जाळे. या केंद्रांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
‘राजहंस प्रकाशन’ ही मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य प्रकाशन संस्था बनवण्यात महत्त्वाचा वाटा.