Nave Kamgar Kayade ani Apan | नवे कामगार कायदे आणि आपण
डॉ. अनंत सरदेशमुख हे कामगार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असून आपल्या प्रभावी नेतृत्व गुणामुळे कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे मार्गदर्शन कामगारांना, उद्योग व्यवसायिकांना व कायदेशीर सल्लागारांना अत्यंत उपयोगी आहे. नवीन कामगार संहितामुळे नोंदणी परवाना ऑनलाइन सुविधा व उद्योगांचे नियमन सोपे झाले आहे. २९ कायद्यांऐवजी ४ संहितांमध्ये एकत्रिकरण झाल्यामुळे सुटसुटीतपणा आला आहे. असे केंद्रसरकारचे मत असले तरी कामगार चळवळीत मात्र सर्वांचे शंका समाधान झालेले नाही. या परिस्थितीत वस्तुनिष्ठ विश्लेषण व ठोस माहिती आवश्यक होती. आता या पुस्तकामुळे कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजून घेऊन त्याप्रमाणे लाभ मिळवणे कामगारांना सोपे झाले आहे व यासाठी श्री. अनंत सरदेशमुख यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. सोप्या मराठीत एकत्रितरीत्या कायदा मांडणी केल्यामुळे सर्वसामान्य मराठी समजणाऱ्या कामगारापर्यंत कायद्याचे ज्ञान सुलभतेने उपलब्ध होत आहे. कायदेशीर तरतुदी सोबत ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्याख्या व नियम यांचे सोप्या भाषेत विवेचन सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाद्वारे पूर्वीच्या कायद्यातील झालेले बदलही तक्ता स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. कामगारांचा मूलभूत हक्क जपण्यासाठी व त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक ज्ञानाची शिदोरी श्री. अनंत सरदेशमुख यांनी सर्वांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे. त्या दृष्टीने सर्व कामगार, व्यावसायिक, उद्योजक व कायदेतज्ञ यांनी संग्रही ठेवण्यासारखे पुरतक आपल्याला उपलब्ध झाले आहे.
- आवृत्ती पहिली : जून २०२६ राजहंस क्र. : F-07-2026 (1255)