* डॉ. अनंत सरदेशमुख मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MCCIA) चे माजी महासंचालक आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.
* बजाज फायनान्स, दीपक नायट्राईट, ट्वेंटीएथ सेन्चुरी कायनेटिक फायनान्स, एम. आय. टी. व इतर संस्थात त्यांनी सुमारे चाळीस वर्षाचा उच्चपदस्थ कार्यानुभव प्राप्त केला.
* सध्या एमकेसीएलच्या व इतर काही बोर्डांचे ते सदस्य आहेत व त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व काही
इतर शिक्षण संस्थांच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत.
* त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन व व्यवस्थापन शास्त्रातील दोन पदव्युत्तर पदव्या, व्यवस्थापनशास्त्रातील पीएच्.डी. आणि कॉर्पोरेट फायनान्स, नॉनबँकिंग फायनान्स, सामान्य व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, सरकारी संबंध, व्यवस्थापन धोरण, या क्षेत्रांमध्ये व्यापक अनुभव आणि कौशल्य प्राप्त केले आहे.
* सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, स्टार्टअप या क्षेत्रांचा विशेष अभ्यास केला आहे व त्यात ते सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांवर उद्योगाचे प्रतिनिधित्व केले.
* विविध वृत्तपत्रातून ते विस्तृत लिखाण करतात. एक कुशल नेता जो आपल्या यशाचे श्रेय देताना म्हणतो, `माझे यश हे मी ज्या कुशल संघांसोबत काम केले, ज्यांचे सदस्य मी फुलांप्रमाणे निवडले त्यांच्यामुळेच आहे.’
डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com