Bypassla Paryay | बायपास'ला पर्याय
'हृदयविकार म्हटला, की तुमच्या-आमच्या शंका भरपूर! हृदयविकार म्हणजे काय? तो का होतो? कसा होतो? कुणाला होतो? कधी होतो?... बायपासला पर्याय असतो का? योगासनं, प्राणायाम, आहारनियंत्रण, किलेशन, ईईसीपी यांबरोबर आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली, तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो का? कसा? हृदयविकार टाळण्यासाठी आणि जडलाच तर नियंत्रणात राहण्यासाठी खाण्यापिण्याची कोणती पथ्यं पाळावीत? या आणि याभोवतीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेतच, शिवाय - दारिद्रयाला टक्कर देत, अंगभूत हुशारी, प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा तसंच वंचितांबद्दल कळकळ असणा-या डॉ. प्रतीक्षा या तरुण डॉक्टरनं या क्षेत्रात हे नेत्रदीपक यश कसं मिळवलं, याचंही उत्तर या पुस्तकात आहे. '
ISBN: 978-81-7434-396-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००७
- सद्य आवृत्ती : जून २०११
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'