Abhishekee :Pandit Jitendra Abhisheki | अभिषेकी -पंडित जितेंद्र अभिषेकी
पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं.
स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच
वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी!
त्यामुळे असेल, आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळं काही करण्याचा अट्टाहास त्यांनी केला नाही;
पण आपोआप खूप काही वेगळं घडत गेलं. त्याविषयी संगीतवर्तुळात कौतुक होतं, कुतूहल होतं.
पं. जसराजजी म्हणत असत, `उस शिष्य का क्या कहना कि जिनके गाने पे उनके गुरुही हजार जान से फिदा हों।'
तर पं. भीमसेन जोशींचा अनुभव होता, `पं. जितेंद्र अभिषेकी हे रसिकांची मागणी असलेले कलाकार आहेत.
त्यांच्याविषयी रसिकांच्या मनात एक वेगळं आकर्षण आहे.'
ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके यांना बुवांच्या चालींमध्ये त्यांचं प्रतिभासंपन्न समृद्ध व्यक्तिमत्त्व
दिसत असे, `मीच काय, अनेक कीर्तिवंत संगीतकारांनी अभ्यास करावा, अशा त्यांच्या नाट्यसंगीतरचना आहेत.'
ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री ज्योत्स्नाबाई भोळे यांनी आपल्या गोव्याच्या गंपूची जडणघडण,
त्याचा उत्कर्ष जवळून पाहिला होता. बुवांना गंपू म्हण-यांपैकी ज्योत्स्नाबाई एक होत्या.
`खूप मोठी शिष्यपरंपरा एका विशिष्ट पद्धतीनं निर्माण करण्याचं फार मोठं श्रेय जितेंद्रला आहे.'
अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२४
- मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : गिरीश सहस्त्रबुद्धे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७'" X ९.५"
- बुक कोड : H-02-2024