Timiratun Tejakade | तिमिरातुनी तेजाकडे
'अंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आज समानार्थी शब्द झाले आहेत. ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीची अंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघड्यांवर अंनिस आणि नरेंद्र दाभोलकर कार्यरत आहेत. या क्षेत्रात या स्वरूपाचे असे व्यापक कार्य भारतातही अपवादानेच असेल. अंधश्रध्दानिर्मूलनाशी संबधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल तात्विक मांडणी या पुस्तकात आहे. विषेश म्हणजे, परिणामकारक कृतिशीलतेमुळे यातील विचारांना आत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे. युगानुयुगे लागलेल्या अंधश्रद्धेच्या ग्रहणाचा तिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास वाचकांत निर्माण करण्यात हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल. '
ISBN: 978-81-7434-489-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०१०
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१८
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'