Drohparva | द्रोहपर्व
'१७७३ ते १७७९ हा काळ! राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा मिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण. या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान तेव्हाच पारतंत्र्यात जाता! ही कहाणी आहे मराठा साम्राज्यातल्या कलहाची, हताशेची, शह-प्रतिशहांची, रणनीतीची अन् अतुल्य पराक्रमाची. ही कहाणी आहे धूर्त इंग्रजांच्या साम्राज्यलालसेची, कपटाची, डाव-प्रतिडावांची अन् मन हेलावून टाकणाऱ्या ‘इष्टुर फाकड्या’ची. इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेली पराक्रमी मराठ्यांची यशोगाथा - ‘वडगावची लढाई’! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी– '
ISBN: 978-81-7434-400-7
- बाईंडिंग : :कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००८
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१६
- मुखपृष्ठ : गोपी कुकडे'